छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागात होणारे चार बालविवाह रोखण्यात पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला यश आले. शनिवारी (दि. १८) तीन तर रविवारी (दि. १९) एक असे एकूण चार बालविवाह रोखण्यात आले.
विशेष म्हणजे रविवारी (दि.१९) सावंगी बायपास भागात सुमारे दीड ते दोन हजार वन्हाड्यांच्या उपस्थितीत सुरू असलेला विवाह दामिनी पथकाने अत्यंत शांततेत व कौशल्याने थांबवला. करमाड भागातील जळगाव फेरण, जटवाडा रोड, आंबेडकर नगर आणि सावंगी बायपास येथे या कारवाया करण्यात आल्या.
अक्षय तृतीयेला बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त असल्याने जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा महिला व बालविकास
१६ वर्ष ४ महिन्यांची वधूः नवरदेव २३ वर्षांचा
अधिकारी नितेश धुर्वे यांनी तत्काळ मुलीच्या वयाची शहानिशा करण्यासाठी आधार कार्ड आणि रामनगर येथील शाळेचा जन्माचा दाखला तपासला. यात नवरी मुलगी (रा. मुकुंदवाडी) अवधी १६ वर्षे ४ महिन्यांची अल्पवयीन असल्याचे तर नवरदेव (रा. फुलेनगर,
हसूल) २३ वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले.
वर्षभरात रोखले ६१ बालविवाह
जिल्ह्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ६१ बालविवाह रोखण्यात आले. छत्रपती संभाजीनगर-२५, पैठण व गंगापूर प्रत्येकी ८, वैजापूर-३, कन्नड, सोयगाव व खुलताबाद प्रत्येकी २, फुलंब्री ४, सिल्लोड-७ असे एकूण ६१ बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे यांनी दिली.
अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विविध पथके स्थापन करण्यात आली होती. रोखण्यात आलेल्या चारही प्रकरणांत कायदेशीर कार्यवाही करत, कुटुंबांचे समुपदेशन करून हे विवाह थांबविण्यात आले. रविवारी (दि. १९) सावंगी बायपास, केंब्रिज चौकाजवळील फंक्शन हॉलमध्ये
बालविवाह होत असल्याची माहिती दामिनी पथक प्रमुख उपनिरीक्षक कांचन मिरघे यांना मिळाली. दामिनी पथक आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट विवाहस्थळ गाठले.
यावेळी नवरदेव आणि नवरी वेशभूषेत होते. सोबत दीड ते दोन हजार वन्हाडी
मंडळींची गर्दी होती. दोन्ही कुटुंबांना बालविवाहाचे कायदेशीर आणि शारीरिक दुष्परिणाम समजावून सांगितले. नगर-सेवक काकडे व इतर नागरिकांनीही मध्यस्थी करत प्रशासनाला सहकार्य केले आणि हा विवाह शांततेत थांबवण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या पालकांना महिला व बाल विकास समितीसमोर मुलीचे वयाचे पुरावे घेऊन हजर राहण्याची नोटीस देण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













